नमस्कार

Saturday, June 28, 2008

माझी पहिली कविता

पावसाळ्यातील रिमझिम  गाणे माझ्या, कवी मनाला जागे करते.
कवी मनाची ती कवीता, पावसालाही याववयास सांगते. 

हळूच एक गार वारा, मला स्पर्श करूनी जातो. 
आणी जाता जाता , त्या पावसाची चाहूल देऊन जातों. 

मग माझ्या कपड्यांवर , काही टीपके पडलेले दिसतात. 
ते दुसरे-तीसरे काही नसून, त्याच पावसाचे थेंब असतात.

हळूच मोठा पाउस येतो , आणी मला भिजवुनी  जातो.
जणू माझ्या सुकलेल्या मनाला , तो मंत्रमुग्ध करूनी जातो

अशा या पावसात , चिंब - चिंब  भिजावस वाटत. 
अशा या पावसात , कुणीतरी हवहवस वाटत

क्षणातच नाहीसा होतो , आणी मला भिजवुनी जातो. 
पण जाता जाता सांगून जातो , मी पून्हा येइन.

मी पून्हा येइन, तुझ्या मनातील दु:खाच्या डोंगराला  नाहीसा करण्यासाठी (2) 

असा हा पाउस काहीचा न बोलता , बरेच काही बोलून जातो. 
म्हणुनच हा पावसाळा मला , आपलासा वाटतो ।

  ******** निलेश नेप्ते ********

No comments:

About Me

My photo
Mumbai, Maharashtra, India
I am computer hardware & networking Engineer. living in chembur-mumbai.
Powered By Blogger

My Counter

counter