पावसाळ्यातील रिमझिम गाणे माझ्या, कवी मनाला जागे
करते. कवी मनाची ती कवीता, पावसालाही याववयास सांगते.
हळूच एक गार वारा, मला स्पर्श करूनी जातो. आणी जाता जाता , त्या पावसाची चाहूल देऊन जातों.
मग माझ्या कपड्यांवर , काही टीपके पडलेले दिसतात. ते दुसरे-तीसरे काही नसून, त्याच पावसाचे थेंब असतात. हळूच मोठा पाउस येतो , आणी मला भिजवुनी जातो. जणू माझ्या सुकलेल्या मनाला , तो मंत्रमुग्ध करूनी जातो
अशा या पावसात , चिंब - चिंब भिजावस वाटत. अशा या पावसात , कुणीतरी हवहवस वाटत
क्षणातच नाहीसा होतो , आणी मला भिजवुनी जातो. पण जाता जाता सांगून जातो , मी पून्हा येइन.
मी पून्हा येइन, तुझ्या मनातील दु:खाच्या डोंगराला नाहीसा करण्यासाठी (2) असा हा पाउस काहीचा न बोलता , बरेच काही बोलून जातो. म्हणुनच हा पावसाळा मला , आपलासा वाटतो ।